मी शिकतो… मला शिकायला पाहिजे,
शाळेतल्या बाकावर मला बसायला पाहिजे,
हरण्या अगोदर जिंकण्याचा विचार करायला पाहिजे,
आणि कोणी काहीही सांगो, पण मनाला वाट्टेल ते करायला पाहिजे
मी बोलतो… मला बोलायला पाहिजे,
किती वेदना साठवू, आता हसायला पाहिजे,
उन्हाळ्याच्या सुट्टीत उन्हात खेळ खेळायला पाहिजे
आणि बालपणाचा आस्वाद वाट्टेल त्या वयात घ्यायला पाहिजे
मनातला आनंद आता वाढायला पाहिजे,
त्याचं तेज चेहेऱ्यावर झळकायला पाहिजे,
मुखवटा नाही.. हा तर माझा स्वभाव आहे, हे सर्वांना कळायला पाहिजे,
आणि आता तरी एखादं पाखरू जाळ्यात अडकायला पाहिजे.
जन्म झाला म्हणून आता जगायला पाहिजे,
घाम, गर्दी, Pollution, इत्यादींची सवय व्हायला पाहिजे,
यातून जर का जीव उरला तर मुक्तीचा विचार केला पाहिजे,
आणि कोणाच्या चुकी मुळे हे जग घडलं, या चुकीचा शोध लावायला पाहिजे
शहाण्या माणसात राहतो… मला शहाणं व्हायला पाहिजे,
1 नाही 2 नाही 3 नाही… मित्रांची संख्या वाढवायला पाहिजे,
“मी socialite झालो” असं लोकांनी म्हणायला पाहिजे,
आणि वाढत्या संख्येचा त्रास चेहेऱ्यावर लपवता आला पाहिजे
माणसं बदलतात…. सर्वांना बदल पाहिजे,
बदल कसाही असो… दृष्टीकोन चांगला पाहिजे,
जन्म आणि मृत्यू यातला प्रवास आनंदमय पाहिजे,
पण या आनंदच्या कारणांची तरी किमान जाणीव असायला पाहिजे.
मला भूक लागते…. घरी अन्न शिजायला पाहिजे
कोणत्याही मार्गाने का होईना पण घरी पैसा आला पाहिजे,
आपले काय हो, दुसरे लोकंही निरागस दिसतात, निष्पाप दिसतात…
पण गरज पडल्यावर हवा तो गळा दाबता आला पाहिजे,
मी शिकतो… मला शिकायलाच पाहिजे…
मी शिकतो… मला शिकायलाच पाहिजे…
SUNDER!MAN AAHE TITHE KAVITA ASALICH PAHIJE !
ReplyDeleteKAVITA AAHE TITHE MAN ASALACH PAHIJE ! JIYO LALA !
Thank you !!!
DeleteThank you !!!
Delete