खिडकी



आजही खिडकी बंद
आजही आतुर डोळे
तीच वस्ती, तीच माणसे
तोच गोंगाट दिवस रात्र

असेच निघती घंटो तास
आठवणीत प्रत्येक श्वास
तेच एकनिष्ठ मन
पण... आजही खिडकी बंद !!!

पावसाचीहि पहिलीच सर
ओल्या मातीतही तोच गंध,
मनातही एकच बात,
प्रत्येक ओल्या वाटेचे एकच ठिकाण...

सकाळचा तोच सूर्योदय,
दुपारचीहि तीच भूक,
मनाचीही तीच रुख-रुख,
आता बेभान वारा देखील एक झुळूक...

वेळ काही थांबेना,
दर्शन काही घडे ना,
गोष्ट मनात राहवेना 
आणि ऐकवू कोणाला समजेना....
पण... खिडकीत “ती” काही दिसेना...

डोळ्यांना आता खिडकी ची सवय,
का म्हणून रोज डोकावून पहावे ???
म्हणून घरातल्या खिडकीला देखील तिच्या खिडकीचा रंग,
आता अजून काय सांगू ... आज पर्यंत “खिडकी” बंद !!!



mango



कैरी-come-आंब्याला इथेय Mango म्हणतात

अर्ध्या पिकलेल्या – हिरव्या केळीला इथेय Fresh Banana म्हणतात,

हे असे सगळे घाई करणारे ....

ह्यांना GOREY का म्हणतात ??


कामाला join करण्या अगोदर इथेय yearly सुट्टी book करतात,

Office मधेय दुपारच्य जेवणाला इथेय dinner असे म्हणतात,

आज इसके तो कल उसके...

ह्यांना GOREY का म्हणतात ???


लग्ना अगोदरच इथेय MOM आणि DAD होतात,

सोळाव्या वर्षातच धुराच्या जाळ्यात अडकतात,

Spirits ला Water ची जागा देणारे...

ह्यांना GOREY का म्हणतात ???


इथेय छोट्या छोट्या steps ला milestones म्हणतात,

काम करणार्या colleagues ला “Don’t work too hard” असं समजावतात,

Without reason CRITICS ला वाव देणारे....

ह्यांना GOREY का म्हणतात ???


अश्या लोकांना GOREY का म्हणतात ???