आजही खिडकी बंद
आजही आतुर डोळे
तीच वस्ती, तीच माणसे
तोच गोंगाट दिवस रात्र
असेच निघती घंटो तास
आठवणीत प्रत्येक श्वास
तेच एकनिष्ठ मन
पण... आजही खिडकी बंद !!!
पावसाचीहि पहिलीच सर
ओल्या मातीतही तोच गंध,
मनातही एकच बात,
प्रत्येक ओल्या वाटेचे एकच ठिकाण...
सकाळचा तोच सूर्योदय,
दुपारचीहि तीच भूक,
मनाचीही तीच रुख-रुख,
आता बेभान वारा देखील एक झुळूक...
वेळ काही थांबेना,
दर्शन काही घडे ना,
गोष्ट मनात राहवेना
आणि ऐकवू कोणाला समजेना....
पण... खिडकीत “ती” काही दिसेना...
डोळ्यांना आता खिडकी ची सवय,
का म्हणून रोज डोकावून पहावे ???
म्हणून घरातल्या खिडकीला देखील तिच्या खिडकीचा रंग,
आता अजून काय सांगू ... आज पर्यंत “खिडकी” बंद !!!

खिडकी...खिडकी...खिडकी
ReplyDelete:)