स्वप्नातील जागा दिवसा साथ सोडत नाही,
हसरा काळ वळून पाठी बघत सुद्धा नाही,
झोपल्यावरही पापणी लवणं सोडत नाही,
आणि भरलेल्या मैफीलीत हवा तो चेहरा काही दिसत नाही…
काय सांगू…… किती MISS करतो तुला !!!
आनंदाचे क्षण माझ्याकडे दुर्लक्ष करतात,
चांगले स्वप्न येताच डोळे उघडू पाहतात,
आता पावसात भिजलो तरी थंडी वाजत नाही,
चिखलात देखील माझ्याशी आता कोणी मस्ती करत नाही…
काय सांगू…… किती MISS करतो तुला !!!
पाउस मला आवडतो म्हणून पावसाला मी आवडवं असा काही नाही,
मी घराबाहेर पडलोकीच त्याने बरसावे............ असहि नाही,
पाउस बदलत्या ऋतू प्रमाणे, क्रमाने येतो,
ठरलेल्या वेळेवर पाउस सुद्धा येतो, यातून माणसाने काहीच कसं शिकवं नाही ???
याव… माझ्याशी खेळावं… माझी ही अपेक्षा चुकीची नाही,
कोणी सांगतो की मी चुकतो… ह्या वर माझा पूर्णविराम नाही,
दुसर्यानी माझ्या रिकाम्या जागा भराव्या… एवढी ही वाईट माझी अवस्था नाही,
माझ्या या अवस्थेवर टीका करण्याचा सगळ्यांनाच अधिकार नाही…
करमणुकीचे प्रकार केवढे….. लोकांना,
आधी पेक्षा जास्ता लोकात राहतो… असं सांगतो सर्वांना,
गर्दीत मी घाबरतो, भांबावतो… असं मुळीच नाही,
पण काय इतका शूद्र झालो की कोणी जादूची झप्पी सुद्धा देत नाही …??
काय सांगू…… किती MISS करतो तुला !!!
क्षणभर हसतो म्हणून खुश आहे... असं नाही,
गप्प बसतो म्हणून कोणी काहीच बोलायचं नाही, असंही नाही,
वरच्या वर्गात गेलो म्हणून आधीचे मित्र तुटत नाही,
मीच माझ्यावरच्या जोक्स वर आता हसणं सोडत नाही…
…………………..एक सांगू तुला??
आता तर माझ्या हसण्यातही तुला MISS करतो !!!
No comments:
Post a Comment